नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत 'रोजगार दो' हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये का आहे?

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (15:44 IST)
सोशल मीडियावर सध्या 'रोजगार दो' हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होतोय. लाखोच्या संख्येने 'रोजगार दो' हा हॅशटॅग वापरून ट्वीट केले जात आहेत. या हॅशटॅग अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून थेट रोजगार देण्याची मागणी केली जात आहे.  
 
कोरोना आरोग्य संकटात अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. मोठ्या संख्येने उद्योगधंदे ठप्प झालेत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारी आहेत. या परिस्थितीत सोशल मीडियावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच नोकरीची मागणी केली जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर 'रोजगार दो' ट्रेंड सुरू झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'मोदी रोजगार दो' या हॅशटॅगचा वापर करत राहुल गांधींनी 'सुनो जन के मन की बात' असा सल्लाही दिला.
 
आयएलओच्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवर बेरोजगारी 57 टक्के एवढी आहे. तर भारतात बेरोजगारीचे प्रमाण 47 टक्क्यांपर्यंत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती