मुंबई-नाशिक मार्गावरील कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे रेल्वे-रस्ते वाहतूक विस्कळीत

सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (09:47 IST)
मुंबई-नाशिक मार्गावरील कसारा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
 
"मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर कसारा घाटात दरड कोसळल्यानं दुरुस्तीचं काम सुरू आहे," असं सेंट्रल रेल्वेनं ट्वीट केलं आहे.
 
2 दिवसांपूर्वी या रस्त्याचा काही भाग खचला होता, त्यामुळे हा रस्ता 10 दिवस बंद करण्याचा निर्णय हायवे अथॉरिटीनं घेतला होता.
 
दरड कोसळ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
 
कसारा घाटातील जवळपास 100 मीटर लांब रस्त्यावर खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या घटना घडत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहे.
दरम्यान, कसारा घाटात कोसळलेल्या दरडीमळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भुसावळ-मुंबई पँसेंजर आणि मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस या गाड्या मनमाडला परत पाठवण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती