पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ

पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारनं मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 होती. 
 
आयकर कायदा 1961 मधील तरतूद 139AA नुसार, पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक असायला हवं. यासाठीची मुदत आता 31 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 करण्यात आल्याची माहिती CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस्) ने अधिकृत ट्वीटर हँडलवर दिली आहे.
 
ही मुदत केंद्र सरकारनं आठव्यांदा वाढवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्णय दिला होता की, आधार कार्ड हे आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती