कोरोना व्हायरस: 'मी श्रीमंत नाहीय, पण अर्धी भाकर तरी गरजूंना देऊच शकतो'

सोमवार, 30 मार्च 2020 (14:55 IST)
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशभरातून अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमधील शेतकऱ्यानं दाखवलेल्या दानशूरपणाचंही कौतुक सर्वत्र होतंय.
 
दत्ताराम पाटील या शेतकऱ्यांनं स्वत:च्या तीन एक जमिनीपैकी एक एकरावर पिकलेला गहू गरजूंना दान करण्यास सुरुवात केलीय. 
 
नाशिकमधील निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे या गावातली दत्ताराम पाटील हा शेतकरी असून, त्याची एकूण तीन एकराची शेती आहे.
 
द्राक्ष खुडे, शीतगृहे, निर्यात केंद्रं बंद असल्यानं मजुरांचे मोठे हाल होत आहेत. हे पाहून दत्ताराम पाटील यांनी स्वत:च्या शेतातली गव्हाची रास मजुरांसाठी खुली केलीय.
 
शेताजवळील वस्तीत हातमजुरांचे अनेक कुटुंब उपाशीपोटी राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचे पाटील सांगतात.
 
दत्ताराम पाटील यांच्या या दानशूरपणाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतली असून, त्यांनी पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती