कोरोना व्हायरस: आनंदी ठेवण्याचे सोपे उपाय

सोमवार, 23 मार्च 2020 (13:54 IST)
विल्यम पार्क
असं वाटतं की आता सगळं संपत चाललंय. सगळीकडं ताणतणावाचं वातावरण आहे. तरी यात एक आशेचा किरण नक्की असतो. तो शोधणं आणि त्याबाबत सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं आहे. पण अशा झाकोळलेल्या वातावरणात आनंदी राहायचं म्हणजे काय करायचं?
 
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी घरात एकटं बसाव लागत आहे. कुणालाही भेटता येत नाही. तर कधी शहर, कधी राज्य तर कधी देश बंद ठेवला जात आहे. जगाच्या अशा चित्रामुळं आपल्या मनात निराशेचं वातावरण निर्माण होणं साहजिक आहे. पण यात एक आनंदाची बातमी आहे. अशा ताणतणावाच्या आणि काहीशा भीतीच्या वातावरणातही तुम्ही स्वत:ला ताजतवानं आणि चांगल्या मूडमध्ये ठेऊ शकता.
 
तसं बघितलं तर मानवी भावनेचं गणित खूप गुंतागुंतीचं आहे. पण आजवर त्याचा खोलवर जाऊन अभ्यासही केला आहे. बीबीसीने गेल्या काही वर्षांत याचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी दररोजच्या जीवनातला ताणतणाव अगदी सहजरीत्या कसा कमी करता येईल याविषयी मुद्देसूद माहिती दिली आहे. त्यापैकीच काही टिप्स तुम्ही या लेखात वाचणार आहात. काही टिप्स तुम्हाला आश्चर्याचा अलगद धक्का देतील.
 
1. सरळ दुर्लक्ष करा
एखादा चिंतेचा मुद्दा सतत आपल्याभोवती घोंगावत राहणं साहजिक आहे. कोरोना व्हायरस, जागतिक तापमान बदल किंवा इतर मुद्देही असेच आहेत. आपल्या चिंता करण्यानं ते काही कमी होत नाहीत. तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचा रक्तदाब सामान्य राहतो. विनाकारण होणारी घालमेल थांबते. यामुळे तुम्हाला नक्की बरं वाटेल.
 
2. ध्यान धारणेचा सगळ्यांनाच फायदा होत नाही
सध्याच्या काळात ध्यान धारणा केल्यानं काही लोकांना बरं वाटू शकेल. पण काहींना ध्यान केल्यानं कोणताही फरक जाणवणार नाही. यामागे एक कारण आहे. स्तब्ध राहिल्यानं एक गोष्ट मनात सारखी येऊ शकते.
मन शांत करताना किंवा निर्मळ करताना ताणतणावाच्या घटना मनात डोकावत राहू शकतात. अशा लोकांना ध्यान धारणेपेक्षा दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये मन अडकवण्याची गरज असते.
 
3. परिस्थितीकडं बघण्याची मानसिकता बदला
आपण आपल्या भावनांना कशा प्रकारे हाताळतो, याचाही तुमच्या मनावर परिणाम होत असतो. २०१७मध्ये डेरेन ब्राऊन यांनी Happy हे पुस्तक लिहिलं होतं. त्यांच्याशी बीबीसीनं याआधी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी दोन टेनिस खेळाडूचं उदाहरण दिलं होतं. एक जो "मी जिंकणारच" हा विचार घेऊन मैदानात उतरतो. जिंकणं हेच सर्वस्वी आहे असं त्याला/तिला वाटतं. पण खेळात हे लोक हरण्याच्या बेतात आले की ते त्यांच्या जिव्हारी लागतं. Mr./Ms Perfectionist साठी हा एक दु:खाचा सापळा बनतो. त्यामुळे त्यांना अधिक दु:ख, राग आणि अपराधी वाटतं. अशा कचाट्यात सापडल्यामुळं शेवटी हातात आलेला सामनाही हरून बसतात.
 
तर दुसरा/री खेळाडू, "मी माझ्या परीनं उत्तम खेळेन" या विचारानं मैदानात उतरतो/उतरते. त्यांचा पराभव जरी झाला तरी ते त्यानं खचून जात नाहीत. कारण त्यांनी त्याच्या पद्धतीनं सर्वोत्तम खेळ खेळलेला असं त्यांना वाटतं. या दोघांनी त्यांच्या अपेक्षेबाबत वेगवेगळा विचार केला होता.
हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनातही वापरू शकता. ताणतणावाच्या काळात तुम्ही तुमच्यापरीनं सर्वोत्तम कामगिरी करा. (म्हणजे, मी व्यवस्थित हात धुवेन, social distanceचं पालन करेन) आता पुढं काय होईल याची काळजी करणार नाही. तर मी आजारीच पडणार नाही अशा भ्रमात राहणं चुकीचं ठरेलं.
 
कोणत्या गोष्टी नियंत्रणात आहेत, याचा विचार करणं गरजेचं आहे. तणावपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यामुळं तम्हाला भीती, काळजी वाटू लागते. तुमच्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर विनाकारण भीती नाहीशी होईल.
 
4. आनंदाच्यामागे पळत सुटू नका
आनंदात राहण्यासाठी अधिक धडपड करण्याचा उलट परिणाम होऊ शकतो. अधाशासारखं सुखाच्या मागे धावल्यानं त्याचं दु:खात रुपांतर होऊ शकते. स्व:च्या सुखासाठी धावल्यानं अनवधानानं आपण आपल्या भोवतीच्या लोकांचा आनंद विसरतो. त्यामुळं तुम्हाला अधिक एकटेपण वाटू शकतो किंवा स्वत:च वाळीत पडल्यासारखं वाटतं.
 
"मला फक्त आनंदीच राहायचं आहे," हेच डोक्यात घेऊन बसलात आणि तसं घडलं नाही तर त्यातून सावरणं अवघड होतं. त्यापेक्षा दररोज छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा प्रयत्न करा.
 
5. गोष्ट छोटी, आनंद मोठा
सतत आनंदी कसं राहता येईल याचा विचार सोडला पाहिजे. आणि ज्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या केल्या पाहिजेत. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लॅनकॅशरमधल्या प्रा. सँडी मन यांनी याविषयी Ten Minutes to Happiness हे पुस्तक लिहीलं आहे. त्यामध्ये त्या 'दररोज डायरी लिहा,' असं सांगतात. त्यांचा हा सल्ला 'सकारात्मक मानसिनकशास्त्र' यावर आधारीत आहे. तुम्हाला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर तुमचा मूड सधारू शकतो, असं त्यांचं मत आहे. त्यासाठी त्यांनी ६ प्रश्नांची यादी केली आहे. हे करायला दररोज केवळ १० मिनीटे लागतात. ते तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मदत करू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती