काँग्रेसची खिंड बाजीप्रभू देशपांडेंसारखी लढवणार - बाळासाहेब थोरात

बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (11:09 IST)
संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे असल्याचं काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.  
 
"काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासाखी काँग्रेसची खिंड लढवणार आहे," असा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये स्वतःच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी केली.
 
इतिहास तोच घडवतो, जो सातत्यानं लढत राहतो, असं म्हणत काँग्रेस सोडणाऱ्यांना बाळासाहेब थोरातांना टोला लगावला.
 
महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रोज 18 तास काम करतोय. पडझडीच्या काळात राज्यासाठी मोठी जबाबदारी माझ्यावर आलीय, असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती