5 हजार भाविक पाकिस्तानातील करतारपूरला जाणार

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (11:35 IST)
गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानला भेट देणाऱ्या शीख भाविकांसांठी पाकिस्तानच्या The Evacuee Trust Property Board नं प्रवासाचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.
 
गुरू नानक जयंतीनिमित्त 5 ते 14 नोव्हेंबरदरम्यान पंजाब आणि अन्य राज्यांमधून जवळपास 5 हजार भाविकांचा जथा पाकिस्तानला जाणार आहे. या पाच हजार भाविकांपैकी अडीच हजार भाविक 9 तारखेला होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाला हजेरी लावतील.
 
प्रवासाच्या कार्यक्रमानुसार हे सर्व भाविक 5 आणि 6 तारखेला हे भाविक वाघा बॉर्डर ओलांडून पाकिस्तानमध्ये जातील. तिथून ते नानकाना साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती