जगातील आदिवासींचा मुक्तिदाता

6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन! सारं जग त्यांना अभिवादन करते. मुंबईच्या चैत्भूमीवर जनसागर उसळतो. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे डॉ. नेल्सन मंडेला यांचे 2013 मध्ये महापरिनिर्वाण झाले! दक्षिण आफ्रिका शोकसागरात बुडाली. आदिवासींचा उद्धारकर्ता गेला! 
 
डॉ. बाबासाहेब आणि डॉ. नेल्सन मंडेला ह्या दोन युगपुरुषांच्या जीवनप्रवासात अनेक साम्ये होती. एक भारतातील अस्पृश्य समाजातील होते, दुसरे दक्षिण आफ्रिकेतील आदिवासी होते. दोघेही मागासवर्गीय! दोघांनी दोन वेगवेगळे महान लढे दिले. दोघेही वकील होते. दोघांनी आपल्या समाजासाठी वकिली केली. दोघांनाही ‘भारतरत्न’ किताब मिळाला होता. दोघांचेही 6 डिसेंबरला महानिर्वाण झाले. आज डॉ. नेल्सन मंडेलांचे युगकार्य शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. 
 
जगातील सर्व आदिवासींचे महानेते डॉ. नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व टोकावरील कुनू नावाच्या   दुर्गम खेडय़ात आदिवासीमधील थेंबू जमातीत झाला. त्यांची झोसा ही बोलीभाषा होती. त्यांचे वडील हेंड्री मंडेला शेती व्यवसाय करीत होते. मंडेलांचे खरे नाव रोलिलाहल्ला. मंडेलांचे सुरुवातीचे शिक्षण क्लार्क बेरी मिशनरी स्कूलमध्ये झाले. त्यांचे नेल्सन हे नाव त्यांच्या शिक्षिकेने ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव सकपाळ होते. त्यांचे आंबेडकर हे आडनाव शिक्षकांनीच ठेवले. उच्च शिक्षण हेल्डटाऊनमध्ये पूर्ण केले. आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ फोर्ट हरेत शिक्षण घेताना विद्यार्थी चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कमी करण्यात आले. त्यांनी घर सोडले व ते थेट जोहान्सबर्गला आले. दोन वर्षानंतर आफ्रिकेत विट्स-वॉटरँड विद्यापीठात काद्याच्या पदवीसाठी नाव नोंदविले. तेथेच आफ्रिकेतील जाती आणि जमातींच लोकांशी-पुढार्‍यांशी ओळख झाली. 1944 साली ‘ए.एन.सी. युथ लीग’ची स्थापना केली आणि कृष्णवर्णिायांवर होणार्‍या अत्याचारांची व्यथा मांडणस सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची जुलमी राजवट चालू होती. मंडेलांकडे उत्तम वक्तृत्व होते. गोर्‍यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी 1949 साली मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरुद्ध बहिष्कार, बंद, असहकार ही आंदोलने सुरू केली व स्वातंत्र्याची जोरदार मागणी केली. त्या काळात जगातील अनेक देश स्वतंत्र झाले. भारतही स्वतंत्र झालेला होता. दुसरे महायुद्ध संपलेले होते. मंडेला देशभर दौरे करून ब्रिटिशांच्या विरोधात रान पेटवत होते. मंडेलांना अटक करण्यात आली. जोहान्सबर्गबाहेर जाण्यास मनाई केली. त्यांनी 1955 साली फ्रीडम चार्टर म्हणजेच स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून ब्रिटिशांना नवे आव्हान दिले. 1956 साली मंडेलांना पकडले गेले व त्यांच्यासह 156 क्रांतिकारकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला भरला. पाच वर्षे खटला चालल्यानंतर त्यांना सन 1961 साली सोडण्यात आले. 1960 साली आफ्रिकेतील शार्पफिल येथे तेथील गोर्‍या सरकारने कृष्णवर्णीय यांचा मोठा नरसंहार घडविला. मंडेलानीही अधिक हिंस्त्रक व्हाचे ठरविले. त्यांनी हातात शस्त्रे घेतली व आफ्रिकन युवकांच्या हातातही शस्त्रे दिली. परंतु 1962 साली ब्रिटिश सरकारने मंडेलांना पकडून त्यांच्यावर दुसर्‍यांदा देशद्रोहाचा खटला भरला. 
 
नेल्सन मंडेला 27 वर्षे तुरूंगात होते. वर्णभेदमुक्त दक्षिण आफ्रिका मला हवी आहे, अशी सिंहगर्जना मंडेलांनी तुरूंगातूनच केली होती. मंडेलांनी तुरूंगात 10 हजार दिवस काढले. परंतु जगातील 10 हजारांपेक्षा अधिक विचारवंत, कवी, लेखकांना त्यांनी चेतना दिली. मंडेलांची तुलना महात्मा गांधींशी न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी करायला हवी.
 
प्रा. भगवान भोईर  

वेबदुनिया वर वाचा