#Ayodhya Verdict भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला- कोर्ट

शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (11:28 IST)
घुमटाखालची जागा हिंदूंना मंदिरासाठी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जागा देण्यात येईल. तिथे मशीद बांधण्यात येईल.
 
हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. मशीद रिकाम्या जागी बांधली होती. पण मशिदीखालचा संरचना इस्लामिक नव्हती. निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला. 
 
पुरातत्व खात्यावर संशय घेता येणार नाही. ही एक विश्वासार्ह संस्था आहे आणि त्यांच्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती