अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (09:45 IST)
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांनी मुस्लिम धर्मगुरु, विचारवंत आणि अभ्यासकांची भेट घेतली. यावेळी निकालानंतर सामाजिक सलोखा आणि एकात्मता कशी टिकवून ठेवण्याची त्यावर चर्चा झाली. आरएसएसकडून कृष्ण गोपाळ, रामलाल आणि माजी मंत्री शहानवाझ हुसेन तसेच मुस्लिम समाजातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.
 
कुठल्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा, बंधुत्व, एकात्मता अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. शांतता राखण्याचे आम्ही सर्वांना आवाहन करु असे शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कालबी  जावाद यांनी केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती