अक्षय तृतीयेला तब्बल 11 वर्षानंतर असा योग

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जात असून शुभ मानला जातो. चैत्र शुक्ल, प्रतिपदा, अक्षय तृतीया असा हा सण. अक्षयचा अर्थ क्षय होणार नाही असं.हा दिवस परशुरामाचा जन्मदिन म्हणून परशुराम तिथी म्हणून साजरा केला जातो. बुधवारी 18 एप्रिल रोजी म्हणजे उद्या अक्षय तृतीया हा सण आहे. यंदाअक्षय तृतीया ही मंगळवारी रात्री 3.45 ला सुरू होणार असून बुधवारी रात्री 1.45 पर्यंत असणार आहे. या दिवशी सूर्य मेषच्या उच्च राशीमध्ये. चंद्र वृषभमध्ये, कृतिका नक्षत्र आणि आयुष्यमान योग असा योग असणार आहे. त्यामुळे यावर्षीची अक्षय तृतीया खास असणार आहे. हा योग तब्बल 11 वर्षानंतर येत आहे. सोनं आणि इतर खरेदीसाठी अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो.
लाभ - सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत, शुभ - सकाळी 10.45 ते 12.20 वाजेपर्यंत, दुपारी - लाभ 15.30 ते 18.45 पर्यंत, अमृत - रात्री 20.08 ते मध्य रात्री 12.20 वाजेपर्यंत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती